नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची पुढील बैठक ४ ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत आरबीआय पुन्हा व्याजदार कपात करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
वाढती महागाई, जागतिक तसे देशातील घसरलेली अर्थव्यवस्था आणि नकारात्मक फलनिष्पत्ती (आउटपुट) या कारणाने आरबीआयला पतधोरणात सुधारणा (अकोमोडिटिव्ह) करावी लागणार आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकेडवारीनुसार किरकोळ बाजारपेठेतील महागाई ही ऑगस्टमध्ये ३.२१ टक्के झाली आहे. जूलैमध्ये हे प्रमाण ३.१५ टक्के होते. अन्नाचे दर वाढल्याने ही महागाई वाढली आहे.
हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ
जपानच्या वित्तीय सेवा देणाऱ्या नोमूरा संस्थेने चौथ्या तिमाहीत ४० बेसीस पाँईटने व्याजदरात कपात होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२० मध्ये देशाचा विकासदर हा ६.९ टक्के होईल, असा अंदाज वर्तविला आहे. हा खूपच सकारात्मक अंदाज असल्याचे नोमूराने म्हटले आहे. आरबीआयच्या ४ ऑक्टोबरच्या बैठकीत विकासदर कमी होण्याबाबतचा अंदाज वर्तविण्यात येईल, असे नोमूराने म्हटले आहे.
हेही वाचा-विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर
गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने व्याजदरात कपात करण्याची गरज असल्याचे बँक ऑफ अमेरिका मेर्रिल लिंचने म्हटले आहे. ऑगस्टमध्ये महागाईचा निर्देशांक हा ३.२ टक्के राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता आरबीआय ५० बेसिस पाँईटने व्याजदरात कपात करेल, अशी शक्यता बँक ऑफ अमेरिका मेर्रिल लिंचने व्यक्त केली आहे.
हेही वाचा-बँक ऑफ बडोदा समितीची पुढील आठवड्यात बैठक, रोखे काढण्यावर होणार चर्चा
आरबीआय ७५ बेसीस पाँईटने कपात करावी, अशी अपेक्षा देशातील ब्रोकर संस्था कोटक सिक्युरिटीजने व्यक्त केली. चालू वर्षात आरबीआयने ४ वेळा व्याजदरात कपात केली आहे.