नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) चालू वर्षात जीडी हा ४.८ टक्के राहील, असा अंदाज वर्तविल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. आयएमफ आणि आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केंद्र सरकारच्या हल्ल्यासाठी तयार हवे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आयएमएफने चालू आर्थिक वर्षात जीडीपी ५ टक्क्यांवरून ४. ८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खरी वस्तुस्थिती पाहावी, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाचा वर्तविलेला जीडीपी आणखी कमी केला तर आश्चर्य वाटणार नसल्याचे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. हे जीडीपीचे प्रमाण देतानाही आयएमएफला खूप कसरत करावी लागली असेल, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
-
IMF Chief Economist Gita Gopinath was one of the first to denounce demonetisation.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I suppose we must prepare ourselves for an attack by government ministers on the IMF and Dr Gita Gopinath.
">IMF Chief Economist Gita Gopinath was one of the first to denounce demonetisation.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 21, 2020
I suppose we must prepare ourselves for an attack by government ministers on the IMF and Dr Gita Gopinath.IMF Chief Economist Gita Gopinath was one of the first to denounce demonetisation.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) January 21, 2020
I suppose we must prepare ourselves for an attack by government ministers on the IMF and Dr Gita Gopinath.
हेही वाचा-प्राप्तिकर कायद्यासह मनी लाँड्रिगमधील फौजदारी कलमाची तरतूद होणार रद्द
गीता गोपीनाथ यांनी नोटाबंदीवर नकारात्मक मत व्यक्त केले होते, याची आठवणही त्यांनी ट्विटमधून करून दिली. सरकार आणि त्यांचे मंत्री आयएमएफ आणि डॉ. गीता गोपीनाथ यांच्यावर हल्ला करणार आहेत, असे समजून आपण तयार असायला हवे. कॉर्पोरेट दरात कपात केल्याने पुढील आर्थिक वर्षात विकासदर उंचावेल, असा गीता गोपीनाथ यांनी अंदाज केला आहे.
हेही वाचा-अडचणीत सापडलेल्या दूरसंचार कंपन्यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका; 'ही' केली विनंती