ETV Bharat / business

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात 35 पैशांनी दरवाढ - पेट्रोल डिझेल पणजी दर

चालू महिन्यात 6 ऑक्टोबरपासून सार्वजनिक तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 84.8 डॉलर आहेत. हा दर गेल्या सात वर्षातील सर्वाधिक आहे.

पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ
पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ
author img

By

Published : Oct 16, 2021, 4:46 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शनिवारी 35 पैशांनी वाढल्या आहेत. किरकोळ इंधन विक्रीत दर वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 35 पैशांनी वाढल्या आहेत.

सार्वजनिक तेल कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे दर रोज बदलण्यात येतात. हे दर स्थानिक कराप्रमाणे विविध राज्यांमध्ये भिन्न आहेत.

हेही वाचा-राहुल गांधींना कशाची भीती वाटते? प्रशांत किशोर यांनी 'हे' दिले उत्तर

असे आहेत प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपये प्रति लिटरहून अधिक आहेत. गोवा आणि बंगळुरूमध्ये डिझेलचे दर प्रति लिटर 100 रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत.
  • दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 105.49 रुपये आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर 111.43 रुपये आहे.
  • मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर 102.15 रुपये प्रति लिटर आहे.
  • दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर 94.22 रुपये आहे.
  • देशातील 12 हून अधिक राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहेत.
  • पणजीमध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर 99.56 आहे. बंगळुरूमध्ये डिझेल प्रति लिटर 99.97 तर सिल्वासामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 99.86 रुपये आहेत.

हेही वाचा-सिंघू सीमा तरुण हत्या प्रकरण: हरियाणा पोलिसांकडून आरोपीला अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

कच्च्या तेलाच्या दराने गाठला उच्चांक

चालू महिन्यात 6 ऑक्टोबरपासून सार्वजनिक तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 84.8 डॉलर आहेत. हा दर गेल्या सात वर्षातील सर्वाधिक आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 12 आणि ऑक्टोबरला स्थिर राहिल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.