ETV Bharat / business

कोरोनाचे संकट : जगभरातील १०० हून अधिक देशांनी आयएमएफकडे मागितली मदत - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आयएमएफच्या अध्यक्षा क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ऑनलाईन वार्षिक बैठक घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, की आपण अपवादात्मक स्थिती आहोत. अशा अपवादात्मक वेळी अपवादात्मक कृती करावी लागणार आहे.

आयएमएफ
आयएमएफ
author img

By

Published : Apr 17, 2020, 12:12 PM IST

वॉशिंग्टन - कोरोनाचे जगभरात संकट आल्याने १०० हून अधिक देशांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदत मागितली आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान टाळण्यासाठी विविध देश मदत मागत असल्याचे आयएमएफच्या अध्यक्षा क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी सांगितले.

आयएमएफच्या अध्यक्षा क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ऑनलाईन वार्षिक बैठक घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, की आपण अपवादात्मक स्थिती आहोत. अशा अपवादात्मक वेळी अपवादात्मक कृती करावी लागणार आहे. अभूतपूर्व संकटावर मात करण्यासाठी व पूर्ववत स्थिती आणण्यासाठी एकत्रिपणे काम करायला पाहिजे. इकुव्डोर, मादागास्कर, रवांडा आणि टोगो अशा १५ देशांनी मागितेली मदत मंजूर करण्यात आली आहे. तर १२ हून अधिक देशांच्या अर्जावर एप्रिल अखेर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजार खुला होताना १,१०० अंशांनी वधारला निर्देशांक

आयएमएफने जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा २०२० मध्ये ३ टक्क्यांनी घसरणार असल्याचे म्हटले आहे. हा विकासदर १९३० नंतर सर्वात कमी असणार आहे. आयएमएफने सर्वच देशांचा विकासदर घसरणार असल्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.