आगरतळा - मंदावलेली अर्थव्यवस्था आणि कोरोनाचा उद्योगांच्या औद्योगिक वृद्धीदर परिणाम होत आहे. अशा स्थितीत ओएनजीसीचा व्यवसाय आणि गुंतवणुकीवर परिणाम झालेला नसल्याचे ओएनजीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर यांनी सांगितले.
ओएनजीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शशी शंकर म्हणाले, आमची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. या वर्षी ओएनजीसी ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील वर्षी अधिक गुंतवणूक करणार आहे. यावेळी शंकर यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
हेही वाचा-औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र नव्हे, 'हे' राज्य ठरले अव्वल
देशाच्या ईशान्येत गॅसवर आधारित नवा उर्जा प्रकल्प आणि औद्योगिक युनिट सुरू करण्यावर विचार सुरू आहे. ईशान्येकडील इंद्रधनुष्य प्रकल्पात ओएनजीसमवेत इतर चार सरकारी कंपन्या सहभागी आहेत. या प्रकल्पामधून १,६५६ केएम गॅस पाईपलाईनमधून ईशान्येतील ८ राज्यांना नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-'जीएसटी हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा वेडेपणा'
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहार समितीने इंद्रधनुष्य प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे ईशान्येकडील राज्यांना पुरेसा नैसर्गिक वायुचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.