ETV Bharat / business

कच्च्या तेलाचे दर वाढूनही ग्राहकांवर फारसा बोझा पडू दिला जाणार नाही, कारण... - petrol diesel prices

सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या दराचा दररोज आढावा घेण्यात येतो. त्यानुसार देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल करण्यात येतात. मात्र निवडणुकीच्यादरम्यान ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

संग्रहित - पेट्रोल पंप
author img

By

Published : Sep 17, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढूनही सरकारी तेल कंपन्या ग्राहकांवर फारसा बोझा लादणार नसल्याचे सूत्राने सांगितले. कारण महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यात पार पडणार आहेत. त्यामुळे सरकार पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रणात ठेवून मतदारांचा रोष टाळण्याचा प्रयत्न करणार आहे.

सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या दराचा दररोज आढावा घेण्यात येतो. त्यानुसार देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल करण्यात येतात. मात्र निवडणुकीच्यादरम्यान ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेल भडकण्यास सुरुवात; जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका

सध्या आणि निवडणूक संपण्यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीवर तेल मार्केटिंग कंपन्यांनी लक्ष ठेवावे, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे सूत्राने म्हटले आहे. तेल कंपनीमधील सूत्राच्या माहितीनुसार गेल्या महिन्यात काही महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीचा आढावा घेण्यात आला नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिलेल्या होत्या. अन्यथा, तेल मार्केटिंग कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे देशातील कच्च्या तेलाच्या किमती बदलत असतात.

कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात टंचाई भासू देणार नाही; सौदी अरेबियाचे भारताला आश्वासन

दरम्यान, दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १४ पैशांनी वाढून ७२.१७ रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर १५ पैशांनी वाढून ६५.५८ रुपये झाला आहे.

सौदीतील प्रकल्पावरील हल्ल्याचा 'भडका'; कच्च्या तेलाच्या दरात १० टक्के भाववाढ

गतवर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले होते. तरीही पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात आले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.