ETV Bharat / business

जपानमध्ये 'जी-२०' अर्थमंत्र्यांची बैठक, निर्मला सीतारमन राहणार उपस्थित - international taxation

सीतारमन यांच्यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे जपानमधील फुकोडामधील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

निर्मला सीतारमन
author img

By

Published : Jun 5, 2019, 1:38 PM IST

नवी दिल्ली - 'जी-२०' राष्ट्रसमुहातील अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची दोन दिवसीय बैठक जपानमध्ये ८ जूनला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सीतारमन यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

सीतारमन यांच्यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे जपानमधील फुकोडामधील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या विषयावर परिषदेमध्ये होणार चर्चा-
जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्या आणि धोक्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. डिजीटल अर्थव्यवस्था होत असताना आंतरराष्ट्रीय कर, कराची जबाबदारी अशा विविध विषयांवरदेखील चर्चा केली जाणार आहे. जागतिक व्यापारातील प्रश्नाबाबतही चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सखोल चर्चा 'जी-२०' नेत्यांच्या परिषदेत केली जाणार आहे. ही परिषद २८-२९ जूनला होणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा दर हा ३.६ टक्क्यांवरून ३.३ टक्के होईल असा अंदाज वर्तविला आहे.

काय आहे जी-२० समूह

जी-२० हा विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रसमूह आहे. यामध्ये भारतासह, अमेरिका, इंग्लंड, चीन, रशिया, सौदी अरेबिया, ब्राझील, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

१९९९ पासून दरवर्षी जी-२० राष्ट्रसमुहाच्या बैठकी पार पडत आहेत. या बैठकीत आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेमधील महत्त्वाच्या देशांना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यात येते. जागतिक आर्थिक व्यवस्थेची प्रगती करण्याचा प्रयत्न जी-२० समुहाकडून केला जातो.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.