ETV Bharat / business

अर्थसंकल्पावरील प्रश्नांना केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभेत देणार उत्तर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारीला संपत आहे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र ८ मार्चला सुरू होत आहे. तर ८ एप्रिलला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Feb 11, 2021, 2:56 PM IST

Updated : Feb 11, 2021, 3:33 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पावर विचारलेल्या प्रश्नांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या (12 फेब्रुवारी) राज्यसभेत उत्तर देणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 1फेब्रुवारीला 2021-22 मध्ये लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला होता.

राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारीला संपत आहे. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाचे दुसरे सत्र 8 मार्चला सुरू होत आहे. तर 8 एप्रिलला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे.

हेही वाचा-प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; पंतजली, कोकसह पेप्सीला कोट्यवधींचा दंड

यंदा प्राप्तिकर रचना 'जैसे थे'

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरोधातील लढाई 2021 मध्येही सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. यंदा प्रथमच अर्थसंकल्पाची छपाई करण्यात आली नाही. अर्थसंकल्पामध्ये प्राप्तीकर रचनेत कसलाही बदल करण्यात न आल्याने करदात्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. गेल्या अर्थसंकल्पात दोन प्रकारातील प्राप्तीकर रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर करदात्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गेल्या वर्षीची कर रचना यावर्षीही तशीच राहणार आहे.

हेही वाचा-रॉयल एनफिल्डकडून एप्रिलमध्ये वाहनांच्या किमती वाढविण्याची शक्यता

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा-

  • 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयटी रिटर्न भरण्यापासून सुट
  • आरोग्य क्षेत्रासाठी 2.23 लाख कोटींची तरतूद
  • नव्या आरोग्य योजनेसाठी 64 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा
  • कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
  • मिशन पोषण 2.0 चा शुभारंभ करणार
  • 16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
  • लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूद
  • रस्ते मंत्रालयासाठी 1.18 लाख कोटींची तरतूद
  • मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद

Last Updated : Feb 11, 2021, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.