नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात नवीन एमएसएमई उद्योगांना चालना देण्यासाठी उद्यम नोंदणी ही योजना लाँच करण्यात आली होती. या योजनेतून महाराष्ट्रात ३७,२०० नवीन एमएसएमई उद्योगांची २५ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करण्यात आली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाळेबंदीमुळे देशातील आर्थिक चलनवलनावर परिणाम झाला. त्यामुळे देशातील एमएसएमई क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील एमएसएमई क्षेत्रावर परिणाम झाला. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलासादायक निर्णय घेतले होते. यामध्ये एमएसएमई उद्योगांना ३ लाख कोटींच्या कर्जासह विविध योजनांचा समावेश होता. नवीन एमएसएमई उद्योगांसाठी उद्यम नोंदणी ही उद्योगानुकूलतेसाठी सुरू करण्यात आली आहे. केवळ आधार क्रमांकावर उद्योजकांना नवीन एमएसएमई उद्योगांची नोंदणी करता येते.
हेही वाचा-जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची कारणे
उद्यम नोंदणीमुळे देशात उद्योगांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. या नोंदणीसाठी कागदपत्रविरहित, ऑनलाईन आणि मोफतपणे उद्योगांची नोंदणी करता येते.
हेही वाचा-देशातील शहरी भागांत १८.७८ दशलक्ष घरांची कमतरता
- महाराष्ट्रात ३७,२०० नवीन एमएसएमई उद्योगांची २५ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ३१,८७८ सूक्ष्म उद्योगांची, ५२५४ लघू उद्योगांची तर ६८ मध्यम उद्योगांची नोंदणी करण्यात आली आहे.
- देशात १ कोटी २२ लाख ३६९ एमएसएमई उद्योगांची ५ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ८९ लाख ५१ हजार ६७८ सूक्ष्म उद्योगांची, १२ लाख १८ हजार ९०७ लघू उद्योगांची तर ४९, ७८४ मध्यम उद्योगांची नोंदणी करण्यात आली आहे.
- इमर्जन्सी क्रेडिट लाईन गँरटी योजनेमधून महाराष्ट्रातील एमएसएमई उद्योगांना ३० हजार ३२४.२२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने एमएसएमई उद्योगांसाठी चॅम्पियन ही वेबसाईट लाँच केली आहे.