नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना उद्योगांसाठी वित्तपुरवठ्यात वाढ करण्याची गरज व्यक्त केली आहे. फिनटेक आणि स्टार्टअपसाठी योग्य ठरतील अशी वित्तीय उत्पादने हवीत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. ते वित्तीय क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवर वेबिनारमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सार्वजनिक क्षेत्राचाही बँकिंग आणि विमा क्षेत्रातही सहभाग असणे आवश्यक आहे. आपली अर्थव्यवस्था प्रगती करत असताना आणि वेगाने प्रगती करता असताना वित्तपुरवठाही खूप महत्त्वाचा झाला आहे. विविध क्षेत्र व नवे आंत्रेप्रेन्युअर यांना वित्त पुरवठा होण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
हेही वाचा-सार्वजनिक बँकांचे खासगीकरण झाल्यास ८० लाख कोटी रुपये धोक्यात
पुढे पंतप्रधान म्हणाले की, तुम्हाला स्टार्टअप आणि फिनटेकसाठी नवीन आणि अधिक चांगली वित्तीय उत्पादने करण्यावर भर द्यावा लागेल. वित्तीय क्षेत्र हे अधिक उर्जादायी, सक्रिय आणि सशक्त करण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढविल्याने पेट्रोल-डिझेल महाग