नवी दिल्ली - राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चालू वर्षात बाजारातून ५५ हजार कोटी उभे करण्यासाठी नियोजन करत आहे. हा निधी व्यवसाय वृद्धी, विविध शेतकरी आणि ग्रामीण विकास योजनांना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
यंदा घेण्यात येणारे कर्ज हे गतवर्षी एवढेच असल्याचे नाबार्डचे चेअरमन हर्ष कुमार भानवाला यांनी सांगितले. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नाबार्डने बाजारातून १२ हजार कोटी उभे केले आहेत.
दीर्घकाळच्या १० ते १५ वर्षाच्या कालावधी असलेल्या रोख्यांतून नाबार्ड निधी जमविते.
नाबार्डकडून सरकारी योजनांना दिली जाते मदत-
गेल्या वर्षी नाबार्डने ५६ हजार ६९ कोटी बाजारातून उभे केले आहेत. त्यामधील ३३,१६९ कोटी रुपये सरकारी योजनांसाठी होते. तर उर्वरित निधी हा संस्थेच्या गरजेसाठी उभे करण्यात आले होते. नाबार्डने स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान कृषीसिंचन योजना यांच्यासाठी निधी पुरविला आहे. नाबार्डच्या कर्जाचे प्रमाण २०१८-१९ मध्ये ४.३२ लाख कोटी झाले आहे.