ETV Bharat / business

करदात्याच्या सोशल मीडिया खात्यावर प्राप्तीकर खाते नजर ठेवते का ? जाणून घ्या सत्य

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) संचालक पी.सी.मोदी म्हणाले, प्राप्तीकर विभागाला अघोषित संपत्ती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवण्याची गरज नाही.

सीबीडीटीचे अध्यक्ष पी.सी.मोदी
author img

By

Published : Jul 14, 2019, 7:22 PM IST

नवी दिल्ली - कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभाग करदात्यांवर विविध मार्गातून नजर ठेवते. एवढेच नव्हेतर करदात्याच्या सोशल मीडियावरही प्राप्तीकर खाते नजर ठेवते, असा अनेकांचा समज आहे. प्रत्यक्षात हा गैरसमज असल्याचे सीबीडीटीचे अध्यक्ष पी.सी.मोदी यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) संचालक पी.सी.मोदी म्हणाले, प्राप्तीकर विभागाला अघोषित संपत्ती जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवण्याची गरज नाही. कारण इतर मार्गातून माहिती आणि डाटा विविध संस्थांमधून मिळत असल्याचे मोदी यांनी सांगितले. करदात्याचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी त्याचे फेसबुक, ट्विटर आणि इनस्टाग्राम पाहिले जाते,का असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

मोदी म्हणाले, प्रत्यक्षात आम्ही प्रवास खर्चाची माहिती अधिकृत स्त्रोताकडून मागवितो. सीबीडीटीने अद्ययावत डाटा अॅनालिटिक्स व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे कोणत्या क्षेत्रावर कर लावायचा आहे अथवा कोणत्या क्षेत्राला दिलासा द्यायचा आहे, हे समजू शकते. या नव्या व्यवस्थेचे 'प्रोजेक्सट इनसाईट' असे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती सीबीडीटीला मिळू शकते.

कर परताव्यासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वीच्या अर्जाची सुविधा करून देण्यात आली आहे. त्यामुळे कराच्या नियमांचे पालन करणे करदात्यांना सोपे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राप्तीकर करदात्यांची अशी मागविते माहिती-
सीबीडीटी हे बँक, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड कंपनी, उप निबंधक आदी तृतीय पक्षांकडून माहिती मागविते. कर परताव्यासाठी अर्ज करताना सर्व माहिती योग्य आहे, याची करदात्यांनी खात्री करणे गरजेचे आहे.

नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने ५ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना प्राप्तीकर परताव्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.