ETV Bharat / business

'या' राज्यांनी करातून मिळवले सर्वाधिक उत्पन्न; महाराष्ट्र देशात अव्वल

'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स- 2020-21'नुसार कर आणि इतर स्थानिक स्रोतांमधून महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांनी 80 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमावलं आहे. यात महाराष्ट्र (Maharashtra ) पहिल्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र
Maharashtra
author img

By

Published : Nov 29, 2021, 2:12 PM IST

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, कर आणि इतर स्थानिक स्रोतांमधून महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांनी 80 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमावलं आहे. यात महाराष्ट्र (Maharashtra ) पहिल्या क्रमांकावर आहे.

80,000 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न कमवाणाऱ्या देशातील पहिल्या सहा राज्यांमध्ये तेलंगणा आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांचे उत्पन्न 80,000 कोटींहून अधिक आहे. तर तेलंगणाचे उत्पन्न हे 85,300 कोटी रुपये आहे. ही माहिती आरबीआयकडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स- 2020-21' मध्ये देण्यात आलेली आहे.

2.2 लाख कोटींहून अधिक उत्पन्नासह महाराष्ट्र या यादीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तामिळनाडूने करांच्या माध्यमातून 1.3 लाख कोटी रुपये कमावले आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्येही एक लाख कोटींहून अधिक कर महसूल आहे. शेजारील आंध्र प्रदेश 70,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या राज्यांच्या यादीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.