ETV Bharat / business

आजपासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल, असा होईल तुमच्यावर परिणाम - प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची तारीख

1 सप्टेंबरपासून ग्राहकांना बदलणाऱ्या नियमांना सामोरे जावे लागणार आहे. हे बदलणारे नियम थोडक्यात जाणून घ्या.

Know rules
Know rules
author img

By

Published : Aug 31, 2021, 3:55 PM IST

Updated : Sep 1, 2021, 7:06 AM IST

नवी दिल्ली - सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदल ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित बाबींशी आहेत.

पॅन आधार लिंक

पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर मुदत आहे. त्यामुळे हे लिंक करण्याची तुमच्याकडे एक महिना मुदत असणार आहे. जर आधार-पॅन हे लिंक नसेल तर आर्थिक व्यवहारात अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच पॅन कार्ड ही निष्क्रीय होण्याची शक्यता आहे. बँकेचे व्यवहार जर 50 हजारांहून अधिक असतील तर पॅन क्रमांकाची गरज लागणार आहे. पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार

डीमॅट अकाउंट केवायसी

सेबीच्या निर्देशानुसार शेअर बाजार ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना डीमॅट अकाउंट अपडेट करावे लागणार आहे. ज्यांना नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायचे आहे, त्यांच्यासाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. आता डीमॅट अकाउंट 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागणार आहे. जर केवायसी नसेल तर अकाउंट बंद होणार आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर बाजारात ट्रेडिंग करावे लागणार नाही.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा संपन्न, इतिहासात प्रथमच...

प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची तारीख

करदात्यांना 30 सप्टेंबरपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार आहे. त्यानंतर ज्यांचे उत्पन्न वार्षिक पाच लाखांहून अधिक असेल त्यांना 5 हजापर्यंत विलंब शुल्क भरावा लागणार आहे. तर 5 लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या प्राप्तिकरदात्यांना 1 हजारापर्यंत विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

हेही वाचा-तेलंगाणामधील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बँक अकाउंट अपडेट

1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम लागू होणार आहे. त्यामुळे विविध बिलांपोटी स्मार्टफोनवर ऑटो डेबिट मोड असेल तर त्या तारखेला पैसे कट होणार आहेत. ही सुविधा सुरू होण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटशी मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.

50 हजारांहून अधिक रक्कम असेल तर पॉझिटिव्ह पे सिस्टम

बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. त्यामुळे 50 हजारांहून अधिक रकमेच्या चेकसाठी तुम्हाला अडचणी भेडसावू शकणार आहेत. बहुतांश बँकांनी 1 सप्टेंबरपासून पीपीएस लागू केली आहे.

हेही वाचा-सप्टेंबरमध्ये 'या' 12 दिवशी बँका राहणार बंद, पहा वेळापत्रक

पीएफ नियम बदलले

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत. त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) हा आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. तसे नसेल तर तुमची कंपनी खात्यावर पीएफ रक्कम जमा करू शकणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने ईपीएफ खातेदारांना आधार क्रमांक हा युएएन क्रमांकाशी लिंक करण्याची सूचना केली आहे.

गॅस सिलिंडरचे बदलणार दर

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर आणि कर्मशियल सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. त्यामुळे 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या दरातील बदलाने ग्राहकांना थेट आर्थिक परिणाम जाणवणार आहे.

पीएनबी सेविंग्ज अकाउंटवरील व्याजदर घटणार

ज्या ग्राहकांचे पीएनबी बँकेत खाते आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. पीएनबी बँक 1 सप्टेंबरपासून बचत खात्यावरील रकमेवरील व्याज दरात कपात करणार आहे. पूर्वी हे दर 3 टक्के होते, सध्या हे दर 2.90 टक्के करण्यात आले आहेत. हे दर 1 सप्टेंबरपासून बदलणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन महागणार

कोरोनाच्या काळात मोबाईलवर वेबसीरीज आणि ओटीटीवर फिल्म पाहण्याची अनेकांना सवय लागली आहे. अशा प्रेक्षकांना 1 सप्टेंबरपासून डिस्ने प्लस आणि हॉटस्टार सबस्क्रिप्शनसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. या ओटीटीचे मासिक शुल्क हे 399 रुपये होते. आता, ग्राहकांना मासिक 499 रुपये द्यावे लागणार आहेत.

रेशन कार्डच्या नियमांत होणार हे बदल

दिल्ली सरकारच्या नवीन नियमांनुसार, जे लोक वैद्यकीय कारणामुळे किंवा वयामुळे रेशन घेण्यासाठी दुकानात जाऊ शकत नाहीत, ते यासाठी दुसऱ्या व्यक्तीला नामांकित करू शकतात. यासह दुसरी व्यक्ती आपल्या रेशन दुकानातून वस्तू आणू शकते. रेशन दुकानातून माल आणण्यासाठी दुकानात बायोमेट्रिकवर बोटांचे ठसे द्यावे लागतात, त्यानंतरच माल उपलब्ध होतो. परंतु काही लोक काही कारणांमुळे रेशन दुकानात जाऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना रेशन मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांना या नवीन नियमाचा फायदा होणार आहे.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये बँकांना 12 दिवस सुट्टी असणार आहे.

Last Updated : Sep 1, 2021, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.