नवी दिल्ली – भारताला पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज आहे. देशाला 10 टक्क्यांचा विकासदर गाठण्यासाठी आणि चीनबरोबर स्पर्धा करण्यासाठी कर्जाचे व्याजदर कमी करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध बँकर के. व्ही. कामत यांनी व्यक्त केले. ते भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) 75 व्या ऑनलाईन परिषदेत बोलत होते.
के. व्ही. कामत म्हणाले, की जर आपण गुंतवणुकीच्या संधीवर लक्ष केंद्रित केले तर आपण चीनबरोबर स्पर्धा करू शकतो. त्याचबरोबर कमी व्याजदराचा निधी आणि उत्कृष्ठ अंमलबजावणी आवश्यक आहे.
येत्या 20 वर्षांसाठी विकास दर 10 टक्के करणे हे आपले भविष्य असणार आहे. कारण, तेवढे करण्यासाठी आपल्यासाठी पुरेसे आहे. सर्व प्रयत्न एकाच दिशेने आणि एकमेकांच्या सहकार्याने होण्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटात कृषी क्षेत्रातील सुधारणांना चालना मिळाली आहे. खूप गोष्टी परत खेड्यांकडे जात आहेत. त्याचवेळी डिजीटलमधून वेगाच्या टप्प्यावरून आपण येत्या पाच वर्षात 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने जात आहोत.
थकबाकीदार कर्जदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एकवेळची कर्जाची पुनर्रचना करावी, अशी नुकतेच कामत यांनी मागणी केली होती.