ETV Bharat / business

चिंताजनक! जीडीपी दुसऱ्या तिमाही दरम्यान घसरून ५.७ टक्के राहणार ; नोमूराचा अहवाल - Auto Sector

नोमूरा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने एप्रिल-जूनदरम्यान अर्थव्यवस्था मंदावणार असल्याचे  अहवालात म्हटले आहे. जुलै-सप्टेंबरदरम्यान अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अहवालात अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक - जीडीपी
author img

By

Published : Aug 21, 2019, 5:21 PM IST

नवी दिल्ली - देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) दुसऱ्या तिमाही दरम्यान घसरून ५.७ टक्के होणार असल्याचा अंदाज नोमूरा संस्थेने अहवालात व्यक्त केला. कमी झालेली मागणी, गुंतवणुकीचे कमी प्रमाण व सेवा क्षेत्राची असमाधानकारक कामगिरीचा हा परिणाम झाल्याचे नोमूराने अहवालात म्हटले आहे.

नोमूरा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने एप्रिल-जूनदरम्यान अर्थव्यवस्था मंदावणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. जुलै-सप्टेंबरदरम्यान अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अहवालात अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ग्राहकांचा कमी झालेला विश्वास, थेट गुंतवणुकीचे कमी झालेले प्रमाण, आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध आणि चलनामधील युद्ध या आव्हानांना अर्थव्यवस्था सामोरे जात आहे. दुसऱ्या तिमाहीदरम्यान जीडीपी ५.७ टक्के होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत विकासदर हा ५.८ टक्के होता. चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीदरम्यान विकासदर हा ६.४ टक्के तर चौथ्या तिमाहीदरम्यान ६.७ टक्के विकासदर होईल, असा अंदाज आहे.

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा विविध क्षेत्रावर जाणवत आहे प्रभाव-
दरम्यान, गेल्या २० वर्षामध्ये प्रथमच वाहन उद्योग तीव्र मंदीचा सामना करत आहे. त्याचा फटका बसल्याने हजारो जणांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. तर स्थावर मालमत्ता क्षेत्रात विक्रीविना पडून राहिलेल्या घरांची संख्या वाढली आहे. पहिल्या तिमाहीत एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या उत्पादन विक्रीवर परिणाम झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुधारणा करण्यासाठी विविध उद्योग प्रतिनिधींची बैठक घेतली होती.

देशाचा विकासदर हा २०१८-१९ मध्ये ६.८ टक्के नोंदविण्यात आला. हा २०१४-१५ नंतर सर्वात कमी विकासदर आहे. पहिल्या तिमाहीची (एप्रिल-जून) आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (सीएसओ) ३० ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.