ETV Bharat / business

विदेशी गंगाजळीत ३.५१ अब्ज डॉलरची वाढ; आरबीआयची आकडेवारी - India foreign exchange reserves

आरबीआय ही केंद्र सरकारच्या विदेशी गंगाजळीचे व्यवस्थापन करते. ही आकडेवारी आरबीआय दर आठवड्याला जाहीर करते. २५ ऑक्टोबरच्या सप्ताहात विदेशी गंगाजळी ही ४४२.५८ अब्ज डॉलर होती. त्यापूर्वीच्या आठवड्यात विदेशी गंगाजळी ही ४४६.०९ अब्ज डॉलर एवढी होती.

संग्रहित- विदेशी गंगाजळी साठा
author img

By

Published : Nov 9, 2019, 12:20 PM IST

मुंबई - देशाच्या विदेशी गंगाजळीत ३.५१ अब्ज डॉलरची वाढ होवून ती ४४६ अब्ज डॉलर झाली आहे. ही माहिती आरबीआयने १ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या सप्ताहाअखेरच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

आरबीआय ही केंद्र सरकारच्या विदेशी गंगाजळीचे व्यवस्थापन करते. ही आकडेवारी आरबीआय दर आठवड्याला जाहीर करते. २५ ऑक्टोबरच्या सप्ताहात विदेशी गंगाजळी ही ४४२.५८ अब्ज डॉलर होती. त्यापूर्वीच्या आठवड्यात विदेशी गंगाजळी ही ४४६.०९ अब्ज डॉलर एवढी होती.
सरकारकडील विदेशी गंगाजळीत विदेशी चलन मालमत्ता (एफसीएएस), सोन्याचा साठा, राखीव निधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील देशाचे स्थान यांचा समावेश होतो.

हेही वाचा-स्वेच्छा निवृत्तीकरिता बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे चारच दिवसात ५० हजार अर्ज

विदेशी चलनाची मालमत्ता वाढल्याने गंगाजळी वाढली आहे. विदेशी चलनाची मालमत्तेचे प्रमाण एकूण ३.२० अब्ज डॉलर एवढे राहिले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील देशाचा राखीव साठा हा १० दशलक्ष डॉलरने वाढून ३.६४ अब्ज डॉलर झाला आहे. तर एसडीआरचे मूल्य हे २ दशलक्ष डॉलरने वाढून १.४४ अब्ज डॉलर झाले आहे.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.