ब्राझिलिया - भारत ही जगातील सर्वात खुली आणि गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते ब्रिक्स व्यापार मंचाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. उद्योगातील नेतृत्वाने भारतात गुंतवणूक करावी, असे पंतप्रधानांनी यावेळी आवाहन केले. देशामधील अमर्यादित शक्यता आणि अगणित संधीचा लाभ घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले.
जागतिक आर्थिक मंदी असतानाही पाच देशांच्या गटाने (ब्रिक्स) आर्थिक प्रगतीचे नेतृत्व केल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, राजकीय स्थिरता असल्याने भारत ही सर्वात अधिक गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था आहे. आम्ही देशाला २०२४ पर्यंत ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था करणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी १.५ लाख कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहेत. ब्रिक्स देशांचे जागतिक आर्थिक प्रगतीमध्ये ५० टक्के योगदान आहे. जागतिक मंदी असतानाही ब्रिक्स देशांनी अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. लाखो लोकांना गरिबीमधून बाहेर काढत तंत्रज्ञान आणि नवसंशोधनात नवे यश मिळविले आहे. ब्रिक्सच्या स्थापनेला दहा वर्ष होत असताना ब्रिक्स मंचाने भविष्यातील प्रयत्नावर विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी हा चांगला मंच आहे.
-
भारत Political Stability, Predictable Policy और Business Friendly Reforms के कारण दुनिया की सबसे open और investment friendly economy है: PM @narendramodi pic.twitter.com/p3S8vxSrou
— PMO India (@PMOIndia) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भारत Political Stability, Predictable Policy और Business Friendly Reforms के कारण दुनिया की सबसे open और investment friendly economy है: PM @narendramodi pic.twitter.com/p3S8vxSrou
— PMO India (@PMOIndia) November 13, 2019भारत Political Stability, Predictable Policy और Business Friendly Reforms के कारण दुनिया की सबसे open और investment friendly economy है: PM @narendramodi pic.twitter.com/p3S8vxSrou
— PMO India (@PMOIndia) November 13, 2019
हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात ५४.६१ अंशाची घसरण; निराशाजनक आर्थिक आकडेवारीचा परिणाम
ब्रिक्स देशामधील व्यवसायांचे नियम सोपे केल्याने सामाईक व्यापार आणि गुंतणूक वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पाच देशांमध्ये कर आणि सीमा शुल्काची प्रक्रिया सोपी होत आहे. बौद्धिक संपदा आणि बँकांच्या भागीदारीमधून व्यवसायिक वातावरण आणखी सोपे होत आहे. याचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी ब्रिक्स देशांनी आवश्यक काय उपक्रम घेता येतील याचा अभ्यास करावा, अशी पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स देशांना व्यक्त केली.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस
ब्राझीलने भारतीयांना व्हिसाशिवाय देशात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनॅरो यांचे आभार मानले. यंदाची ब्रिक्स परिषद ही ११ वी आहे. सदस्य देशांबरोबर संबंध बळकट करणे आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सदस्य देशांबरोबर सहकार्य वाढविणे, यावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे.