ETV Bharat / business

'अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्याकरता देशाकडून सुधारणा'

author img

By

Published : Jan 9, 2021, 6:58 PM IST

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही उत्पादन, कार्यक्षमतेत मोठे परिवर्तन घडविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे भारतीय उद्योग खऱ्या अर्थाने निर्यातीच्या क्षेत्रात विस्तारू शकतो.

पीयूष गोयल
पीयूष गोयल

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगाने संरचनात्मक सुधारणा करत भारत संपूर्ण इकोसिस्टिम बळकट करत असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते प्रवासी भारतीय दिवस परिषदेत बोलत होते.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही उत्पादन, कार्यक्षमतेत मोठे परिवर्तन घडविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे भारतीय उद्योग खऱ्या अर्थाने निर्यातीच्या क्षेत्रात विस्तारू शकतो. भारतीय उद्योग आणखी मोठा, अधिक चांगला आणि व्यापक होऊ शकतो.

हेही वाचा-भन्नाट! भारतीय भाषांमध्ये मोफत डोमेन रजिस्टर करता येणार

पुढे गोयल म्हणाले की, भारतीय उत्पादने आक्रमकपणे जगभरात पोहोचण्यासाठी नवीन बाजारपेठात विस्तार केला जात आहे. विदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशांना ग्राहकांच्या बाजारपेठेविषयी अधिक परिचय असतो. त्यांना ग्राहकांचे वर्तन माहित असल्याने ते विदेश बाजारपेठेत उत्पादने विकसित होऊ शकतात. कोरोना महामारीमुळे व्यवस्था विस्कळित झाली आहे.

हेही वाचा-डिजीटल माध्यमातून सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्यांना मिळणार सवलत

आत्मनिर्भर भारत म्हणजे दरवाजे बंद करणे नाही-

धाडस केल्याशिवाय मोठ्या गोष्टी होऊ शकत नाही, हे अनेकांना लक्षात आले आहे. अन्यथा आपण जागतिक नेतृत्व मिळविण्याची क्षमता गमावणार आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे दरवाजे बंद करणे नाही. तर भारताची क्षमता आणि पात्रता ही अधिक वेगवान व बळकट करणे आहे. उद्योगानुकूलता, उद्योग सुरू करणे आणि उद्योग वाढविण्यासाठी सोपे नियम असा सरकारचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.