ETV Bharat / business

कोरोना महामारीतही भारतामधील थेट विदेशी गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी वाढ - थेट विदेशी गुंतवणूक न्यूज

जागतिक गुंतवणुकदारांनी भारताला थेट विदेश गुंतवणुकीत पसंती दर्शविल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा आणि उद्योगानुकलतेत बदल केल्याने गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत झाल्याचे सरकारने नमूद केले आहे.

FDI
थेट विदेशी गुंतवणूक
author img

By

Published : May 24, 2021, 10:08 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीत जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होऊनही पुरवठा साखळी विस्कळित झालेली नाही. मागील वर्षात देशाला थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) 81.72 अब्ज डॉलर मिळाले आहेत. ही गुंतवणूक त्यामागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त असल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने थेट विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयाने मागील आर्थिक वर्षात एफडीआयमध्ये 74.39 अब्ज डॉलरचे गुंतवणूक मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 81.72 अब्ज डॉलरची गुंतवणूक ही एफडीआयमधून मिळाली आहे. त्यापूर्वी आर्थिक वर्षात 59.64 अब्ज डॉलर व त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात 49.98 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली आहे.

हेही वाचा-वाहन उत्पादक कंपनी कियाने बदलले नाव; नव्या ब्रँडिंगकरता निर्णय

जागतिक गुंतवणुकदारांनी भारताला थेट विदेश गुंतवणुकीत पसंती दर्शविल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा आणि उद्योगानुकलतेत बदल केल्याने गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत झाल्याचे सरकारने नमूद केले आहे.

हेही वाचा- सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा

असे राहिले गुंतवणुकीचे प्रमाण-

  • भारतामधील थेट विदेशी गुंतवणुकीत सिंगापूरचा पहिला क्रमांक आहे.
  • सिंगापूरचा मागील आर्थिक वर्षातील थेट विदेशी गुंतवणुकीत 29 टक्के हिस्सा आहे.
  • त्यानंतर अमेरिकेचा 23 टक्के आणि मॉरिशसचा 9 टक्के हिस्सा राहिला आहे.
  • कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये सर्वाधिक 44 टक्के थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.
  • त्यापाठोपाठ बांधकाम (पायाभूत सुविधा) आणि सेवा क्षेत्र 8 टक्के अशी थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.