ETV Bharat / business

'अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता एफडीआयमधून 50 ते 60 लाख कोटींची गरज'

सद्यस्थितीला देशाला चलनाच्या तरलतेची गरज आहे. चलनाच्या तरलतेशिवाय अर्थव्यवस्थेच्या चाकांना गती देणे शक्य नाही, असे केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले आहे.

संग्रहित- नितीन गडकरी
संग्रहित- नितीन गडकरी
author img

By

Published : Jul 2, 2020, 6:15 PM IST

नवी दिल्ली – देशाला सुमारे 50 ते 60 लाख कोटींच्या विदेशी गुंतवणुकीची गरज आहे. या निधीचा वापर एमएसएमई क्षेत्राला चालना देण्याकरता येवू शकतो. तसेच कोरोनाच्या संकटाने फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणे शक्य होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

सद्यस्थितीला देशाला चलनाच्या तरलतेची गरज आहे. चलनाच्या तरलतेशिवाय अर्थव्यवस्थेच्या चाकांना गती देणे शक्य नाही, असे केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केले आहे. महामार्ग, विमानतळ, जलवाहतूक, रेल्वे, लॉजिस्टिक्स पार्क आणि एमएसएमई क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित केली जावू शकते, असे गडकरींनी म्हटले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, एमएसएमई, बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि बँकांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे. महामार्गात थेट विदेशी गुंतवणूक होण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. यापूर्वीच काही एमएसएमई हे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. दुबई आणि अमेरिकेमधील गुंतवणूकदारांशी मी बोललो आहे.

पुढे ते म्हणाले, की कातडी उद्योगातील दीड लाख कामगारांना ठाण्यातील क्लस्टरमध्ये हलविण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. हे क्लस्टर दिल्ली-मुंबई महामार्गाजवळ आहे. त्यामध्ये शाळा, रुग्णालये आणि परवडणाऱ्या दरातील घरे असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामागे समाजातील मागास घटकांच्या प्रगतीला चालना देणे हा सामाजिक-आर्थिक विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.