नवी दिल्ली - भारत आणि मॉरिशसमध्ये मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे. या करारामुळे भारतामधील ३०० हून अधिक वस्तुंना आफ्रिकेमधील बाजारपेठेत सीमा शुल्कात सवलत मिळणार आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव अनुप वाधवान आणि मॉरिशिसचे राजदूत हेमॅनदोयाल डायल्लम, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मॉरिशिसचे सरकार यांच्यामध्ये सीईसीपीए करार झाला आहे. हा करार मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगनाथ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत अस्तित्वात आला आहे. भारताने पहिल्यांदाच आफ्रिकेमधील देशाबरोबर सीईसीपीए हा करार केला आहे. हा करार प्रत्यक्षात लवकरच लागू होणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या कराराला १७ फेब्रुवारीलाच मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-वैयक्तिक गोपनीयतेकरता जागतिक पातळीवर नियम व्हावेत- सत्या नाडेला
दोन्ही देशांना मिळणार व्यापाऱ्याच्या संधी
मॉरिशसच्या ६१५ उत्पादनांना भारतामधील बाजारपेठेत प्राधान्याने संधी मिळमार आहे. यामध्ये गोठलेले मासे, साखर, बिस्कीटस, ताजी फळे, फळांचा रस, पिण्याचे पाणी, बिअर, मद्यपेये, साबण, वैद्यकीय आणि शस्त्रकियेची उत्पादने यांचा समावेश आहे. मुक्त व्यापार करारानुसार दोन्ही व्यापारी भागीदार देश हे सीमा शुल्कात कपात करणार आहेत. भारतामधील कृषी, कापड, इलेक्ट्रॉनिक्ससह इतर क्षेत्रातील उत्पादनांना मॉरिशसमध्ये मोठी बाजारपेठ मिळणार आहे.
हेही वाचा-धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल दरवाढीचे खापर फोडले जागतिक बाजारावर!