वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या अंदाजित राष्ट्रीय सकल उत्पन्नात १.२ टक्क्यांची कपात केली आहे. आयएमएफने एप्रिलमध्ये वर्तविलेला जीडीपी १.२ टक्क्यांनी कमी होवून ६.१ टक्के होईल, असे मंगळवारी म्हटले आहे.
आयएमएफने तीनच महिन्यात जीडीपीचा अंदाज घटविला आहे. चालू वर्षात जीडीपी हा ७.३ टक्के होईल, असे आयएमएफने म्हटले आहे.
जागतिक बँकेने देशाचा जीडीपी हा गतवर्षीच्या ६.९ टक्क्यावंरून चालू वर्षात ६ टक्के होईल, असे म्हटले आहे. जागतिक बँकेने एप्रिलच्या तुलनेतच जीडीपीच्या अंदाजात घट केली आहे. चीनचा जीडीपी हा गतवर्षी ६.६ टक्के होता. चालू वर्षात चीनचा जीडीपी हा ६.१ टक्के राहिल, असा जागतिक बँकेने अंदाज वर्तविला आहे.
आयएमएफने हा दिला आहे इशारा -
जागतिक अर्थव्यवस्थेत एकाचवेळी मंदावलेली अर्थव्यवस्था जाणवत आहे. याचा परिणाम म्हणून चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर गेल्या ९० वर्षात सर्वात कमी राहणार आहे. याचा परिणाम सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेत अधिक स्पष्ट जाणवणार असल्याचा इशारा नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी दिला.