वॉशिंग्टन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 39.45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर केला. महामार्ग तसेच सर्वसामान्यांना परवडणारी घरे अशी अनेक योजनांचा समावेश आहे. याद्वारे कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (imf managing director Kristalina Georgieva) यांनी म्हटले आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2022 हा भारतासाठी अत्यंत 'विचारशील' धोरणाचा अजेंडा आहे. आणि तो मानवी भांडवल गुंतवणुकीवर भर देणार आहे. त्याचबरोबर डिजिटायझेशनवर संशोधन आणि विकासामध्ये नाविन्यपूर्णतेवर भर देईल, असेही त्यांनी सांगितले.
7.5 लाख कोटी रुपयाचा प्रस्ताव
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 39.45 लाख कोटी रुपयांचा ( Union Budget 2022 ) अर्थसंकल्प सादर केला. ज्यात परवडणाऱ्या घरांसाठी महामार्गांवर जास्त खर्चाचा प्रस्ताव आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी रोजगार निर्मिती आणि आर्थिक क्रियाकलाप मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च करण्यावर भर दिला आहे. एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात भांडवली खर्च 35 टक्क्यांनी वाढून 7.5 लाख कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
पूर्ण वाढीचा अंदाज
आम्ही भारतासाठी पूर्ण वाढीचा अंदाज व्यक्त करत आहोत,” जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी काही पत्रकारांशी डिजिटल संवाद साधताना सांगितले. अर्थातच 2022 च्या 9.5 टक्के जीडीपीच्या आमच्या अंदाजापेक्षा ते थोडे कमी असणे अपेक्षित आहे, परंतु आम्ही 2023 साठीच्या अंदाजात किंचित सुधारणा करू. कारण आम्ही शाश्वत वाढ पाहणार आहोत जी यापेक्षा फार वेगळी नाही, असा अंदाज अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - UNION BUDGET 2022 : शेअर बाजार गुंतवणूकदार आणि बाजार तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया