ETV Bharat / business

'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात - Potash Export

जैवभौगोलिक अभ्यासामधून नागौर-गंगानगरच्या नदीपात्रात स्फुरदचा सुमारे २ हजार ४०० दशलक्ष साठा असल्याची माहिती मिळाली आहे. हे नदीपात्र श्रीगंगानगर, हनुमानगड आणि बिकानेर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे.

संपादित - स्फुरद साठा
author img

By

Published : Nov 15, 2019, 8:05 PM IST

जयपूर - देशाच्या आयातीचे बिल कमी करू शकणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमध्ये स्फुरदचा (पोटॅश) प्रचंड साठा आढळला आहे. यामुळे देशाला स्फुरदची आयात करावी लागणार नाही, असे सांगितले जात आहे.

जैवभौगोलिक अभ्यासामधून नागौर-गंगानगरच्या नदीपात्रात स्फुरदचा सुमारे २ हजार ४०० दशलक्ष साठा असल्याची पुष्टी मिळाली आहे. हे नदीपात्र श्रीगंगानगर, हनुमानगड आणि बिकानेर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. हा स्फुरदचा साठा जगातील एकूण जाहीर करण्यात आलेल्या साठ्याच्या ५ पट असल्याचे राजस्थानचे मुख्य सचिव डी. बी. गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता हे दिल्लीमधील एका बैठकीत बोलत होते.

देशांतर्गत गरजेची पूर्तता करण्यासाठी भारत स्फुरदची आयात करतो. भारताने २०१३-१४ ते २०१८-१९ पर्यंत दरवर्षी सुमारे ५ दशलक्ष टन स्फुरदची आयात केली आहे. या मागणीत दरवर्षी ६ ते ७ टक्के वाढ होत आहे. त्यासाठी देशाचे सुमारे १० हजार ते १५ हजार कोटी रुपये खर्च होतात. मात्र, राजस्थानमध्ये स्फुरदचा मोठा साठा आढळल्याने देश स्फुरदचा निर्यातदार देश होईल, असे गुप्ता यांनी सांगितले.

राजस्थान सरकार स्फुरदचे खणन करण्यासाठी खासगी कंपनीबरोबर सामजंस्य करार करून सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणार आहे.

Intro:Body:

India's exports dipped by 1.11 per cent to USD 26.38 billion in October. Imports too declined by 16.31 per cent to USD 37.39 billion, narrowing trade deficit to USD 11 billion.

New Delhi: The country's exports dipped by 1.11 per cent to USD 26.38 billion in October on account of contraction in sectors like petroleum and leather.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.