नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यासह अर्थव्यवस्थेवरही संकट घोंगावत आहे. अशावेळी आरोग्याच्या संकटावर मात करण्याची देशाची क्षमता आहे, असे बहुतांश भारतीयांना वाटते. मात्र, आर्थिक आघाडीवर लोकांना देशाच्या क्षमतेबद्दल संशय आहे. ही माहिती कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टीआरएटी सर्व्हेतून समोर आली आहे.
आरोग्याच्या संकटावर मात करण्याची भारताची क्षमता असल्याचा ७३ टक्के उपभोक्त्यांना विश्वास आहे. हा विश्वास चांगल्या प्रमाणात आहे. तर देशाच्या आर्थिक क्षमतांवर त्या मानाने कमी म्हणजे ६३ टक्के लोकांचा विश्वास आहे. यामधून दीर्घकाळ असलेल्या वित्तीय आणि आर्थिक परिणामांची लोकांमध्ये भीती असल्याचे दिसून आले. हे सर्वेक्षण 'टीआरए कोरोनाव्हायरस कन्झ्म्युअर इनसाईट २०२०' या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
हेही वाचा-टाळेबंदी शिथील : मॉल वगळता दुकाने सुरू करण्याची गृहमंत्रालयाची परवानगी
आरोग्याचे संकट दूर जावून स्थिती पूर्ववत हे होईल, असे वाटणाऱ्या भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. तर अर्थव्यवस्था पूर्ववत होईल, असे केवळ १० टक्के भारतीयांना वाटते. जर व्यवसायांना थेट आर्थिक सहकार्य केले नाही तर भारताचे आर्थिक भविष्य कमकुवत राहिल, असे टीआरए रिसर्चे सीईओ एन. चंद्रमौळी यांनी म्हटले आहे. टाळेबंदी लांबल्याने भारतीयांना आर्थिक भविष्याबाबत असुरक्षितता वाटते. व्यवसाय हे संकटावर कसे मात करणार ही अनिश्चितता असल्याचे सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाने आर्थिक संकट : वित्त आयोगाने केंद्र सरकारला 'हा' दिला सल्ला