नवी दिल्ली - कोरोना महामारीत केंद्र सरकारने प्राप्तिकरदात्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने २०२०-२१ साठी प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवून ३० सप्टेंबर केली आहे.
प्राप्तिकर कायद्यानुसार ज्यांचे खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता असते आणि जे आयटीआर-१ आणि आयटीआर-४ फॉर्म भरतात, त्यांच्यासाठी प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत ३१ जुलै आहे. तर कंपनी अथवा संस्था अशा करदात्यांसाठी प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाचे ई-फायलिंग पोर्टल १ ते ६ जून राहणार बंद
विविध प्राप्तिकरदात्यांना अशी देण्यात आली आहे मुदतवाढ
- सीबीडीटीच्या परिपत्रकानुसार कोरोना महामारीच्या स्थितीमुळे करदात्यांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना जारी करण्यात येणारे फॉर्म १६ ची मुदत १ महिन्यांनी वाढवून १५ जुलै करण्यात आली आहे.
- कर लेखापरीक्षणाचा अहवाल जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर आणि प्रायसिंग सर्टिफिकेट कागदपत्राची मुदत एक महिन्यांनी वाढून ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर परताव्यासाठी पुन्हा अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत आता ३१ जानेवारी २०२२ करण्यात आलेली आहे.
- वित्तीय संस्थांनी आर्थिक व्यवहाराची माहिती (एसएफटी) देण्याची मुदत ही ३० जूनवरून ३१ मे २०२१ करण्यात आली आहे.
हेही वाचा-गुगल पेसारखे विविध डिजीटल वॉलेट ठेवण्याची लागणार नाही गरज; आरबीआयने 'हे' दिले निर्देश
करदात्यांना नियमांचे पालन करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिलणार असल्याचे नानजिया अँड कंपनी एलएलपी पार्टनरचे शैलेश कुमार यांनी सांगितले.