नवी दिल्ली - एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत असताना अर्थव्यवस्थेबद्दलची चिंताजनक आकेडवारी समोर आली आहे. जानेवारी-मार्च २०१८-२०१९ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) ५.८ टक्के नोंद झाली आहे. हे जीडीपीचे प्रमाण गेल्या पाच वर्षात सर्वात कमी आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकेडवारीनुसार आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे प्रमाण ६.८ टक्के होते. विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तुलनेने अधिक म्हणजे ७.२ टक्के जीडीपीचे प्रमाण होते. यापूर्वी आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्येदेखील ६.४ टक्के एवढ्या कमी जीडीपीची नोंद झाली आहे. जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था आहे.