नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय हवाई क्षेत्राच्या वापरातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. त्यामधून नागरी विमान वाहतूक क्षेत्राला १ हजार कोटींचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजमध्ये आठ क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. देशातील केवळ ६० टक्के हवाई क्षेत्र नागरी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अधिक हवाई क्षेत्र उपलब्ध झाल्यास प्रवासाची वेळ आणि इंधन बचत होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. देशातील सहा विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा-'या' राज्यात आजपासून सुरू होणार ऑटोमोबाईलसह एसी शोरुमची दुकाने
विमानांची देखभाल आणि दुरुस्तीवरील (एमआरओ) कर हा एकसमान करण्यात येणार आहे. विमानांच्या सुट्ट्या भागांचा खर्च आणि दुरुस्तीचा खर्च हा येत्या तीन वर्षात ८०० कोटींवरून २ हजार कोटी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. देशातील विमानतळावर अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण खर्च करणार आहे.
हेही वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी