नवी दिल्ली - सलग सहाव्या महिन्यात देशाच्या निर्यातीत घसरण झाली आहे. जानेवारीत १.६६ टक्क्यांची घसरण होऊन २५.९७ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.
निर्यातीबरोबरही देशात करण्यात येणाऱ्या आयातीतही ०.७५ टक्क्यांची घसरण झाली आहे. जानेवारीत ४१.१४ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. तर व्यापार तूट ही १५.१७ अब्ज डॉलरची झाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये १५.०५ अब्ज डॉलरची व्यापारी तूट होती.
हेही वाचा-'एजीआर थकित शुल्काबाबत समस्या उद्भवल्यास अंतर्गत चर्चा करू'
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारीदरम्यान १.९३ टक्क्यांची घसरण होवून २६५.२६ अब्ज डॉलरची निर्यात झाली. तर ८.१२ टक्क्यांनी आयात कमी होऊन ३९८.५३ अब्ज डॉलरची आयात झाली. चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत १३३.२७ अब्ज डॉलरची व्यापारी तूट राहिली आहे.
हेही वाचा- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून होणाऱ्या टीकेला भाजप असे देणार 'उत्तर'