ETV Bharat / business

विविध राज्यांच्या उर्जा मंत्र्यांची गुजरातमध्ये परिषद; विद्युतसह उर्जेवर होणार चर्चा

केंद्रीय विद्युत आणि अपारंपरिक उर्जा मंत्री आर. के. सिंह  हे परिषदेचे उद्धाटन करणार आहेत. ही माहिती गुजरातचे उर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी गांधीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

सौजन्य - ट्विटर
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:43 PM IST

अहमदाबाद - देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उर्जा मंत्र्यांची आजपासून दोन दिवसीय परिषद गुजरातमध्ये आयोजित पार पडणार आहे. ही परिषद नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळ केवाडियात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत वीज आणि उर्जेबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

केंद्रीय विद्युत आणि अपारंपरिक उर्जा मंत्री आर. के. सिंह हे परिषदेचे उद्धाटन करणार आहेत. ही माहिती गुजरातचे उर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी गांधीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. या बैठकीत सचिव, विविध राज्यांच्या मंडळांचे व्यवस्थापकीय संचालक, चेअरमन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर एनटीपीसी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आणि एनएचपीसी अशा सरकारी संस्थांचे व्यस्थापकीय संचालकदेखील परिषदेला हजेरी लावणार आहेत.

सौरछतासारख्या नव्या योजना, नवे सौर पार्क सुरू करणे व अपारंपरिक उर्जेचे कार्यक्रम अशा विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय उद्योगानुकलता, उर्जा संवर्धन आणि अपारंपरिक उर्जांचे मोठे पार्क सुरू करण्यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.

Intro:Body:

Dummy-Businessnews

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.