ETV Bharat / business

'देशाची अर्थव्यवस्था रोज बुडत आहे' - Chidambaram speech in Bharat Bachao rally

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. सी. चिदंबरम यांनी  'भारत बचाओ मोर्चा'मध्ये मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. सध्या असलेला बेरोजगारीचा दर  गेल्या २० वर्षातील सर्वाधिक आहे.

P. C. Chidambaram
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. सी. चिदंबरम
author img

By

Published : Dec 14, 2019, 2:41 PM IST

Updated : Dec 14, 2019, 2:53 PM IST

नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेच्या घसरत्या विकासदरावरून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. सी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्या सहा महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्था बुडाली आहे, अशी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते 'भारत बचाओ' मोर्चामध्ये बोलत होते.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. सी. चिदंबरम यांनी 'भारत बचाओ मोर्चा'मध्ये मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. सध्या असलेला बेरोजगारीचा दर गेल्या २० वर्षातील सर्वाधिक आहे. प्रत्येक दिवशी अर्थव्यवस्था बुडत आहे. दररोज एका अंशाने अर्थव्यवस्था बुडत आहे. अन्नधान्यातील महागाई १० टक्क्यांवर पोहोचली आहे. तर गेली चार महिने निर्यात घटली आहे. रोज वाईट बातमी मिळत आहे. तुम्हाला आणखी वाईट बातमी मिळेल, असा त्यांनी अर्थव्यवस्थेवरून इशारा दिला.
गेल्या सहा महिन्यात नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची रचना तोडली आहे.

चिदंबरम यांचा मोदी सरकारवर घणाघात

हेही वाचा-देशाच्या निर्यातीत सलग चौथ्या महिन्यात घसरण

काल (शुक्रवारी) निर्मला सीतारामन यांनी सर्वकाही ठीक असल्याचे व आपण वरच्या क्रमांकावर असल्याचे म्हटले होते. यावर चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काहीही कल्पना नाही, अशी टीका केली. अच्छे दिन आहेत, असल्याचे त्यांनी म्हटले नाही. पैसे देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पण त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा शब्दात चिंदबरम यांनी अर्थमंत्र्यांवर टीका केली.

हेही वाचा-महागाई-मंदीवर प्रश्न विचारताच निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'नो कॉमेंट'

भारत बचाओ मोर्चात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी उपस्थित होते.

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांचा थकित जीएसटी मोबदला देणार असल्याचे शुक्रवारी पत्रकार म्हटले होते. तर महागाई व मंदीबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

Intro:Body:

New Delhi: Former Finance Minister and senior Congress leader P Chidambaram on Saturday attacked the central government and said that it has wrecked India's economy over the last six months.

"Today, India's economy is completely broken. Today we have the highest rate of unemployment in about 20 years" Chidambaram said at the Bharat Bachao rally.

Conclusion:
Last Updated : Dec 14, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.