ETV Bharat / business

अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी निवड - Executive Director for IMF

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने अर्थतज्ज्ञ डॉ. सुरजित एस. भल्ला यांची (भारतीय) कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे.  सुरजित भल्ला हे पदभार स्वीकारल्यापासून तीन वर्षे कामकाज सांभाळतील, असे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने म्हटले आहे.

संग्रहित - अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला
author img

By

Published : Oct 2, 2019, 1:26 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची भारताचे कार्यकारी संचालक म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर निवड केली. भल्ला यांचा तीन वर्षांसाठी कार्यकाळ असणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने अर्थतज्ज्ञ डॉ. सुरजित एस. भल्ला यांची (भारतीय) कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. सुरजित भल्ला हे पदभार स्विकारल्यापासून तीन वर्षे कामकाज सांभाळतील, असे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने म्हटले आहे. सुबिर गोकर्ण यांचे गतवर्षी जूलैमध्ये निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते. यापूर्वी भल्ला हे पंतप्रधान नरेंद्र यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये होते. मात्र, त्यांनी काही कारणांनी राजीनामा दिला होता.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला झटका : सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवा करसंकलनाची १९ महिन्यांतील निचांकी नोंद

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही १८९ देशांबरोबर काम करणारी संस्था आहे. जागतिक पतधोरण, वित्तीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुविधा देणे आणि गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आयएमएफ काम करते. आयएमएफच्या कार्यकारी संचालक मंडळात २४ संचालकांचा समावेश होतो. या संचालकांची सदस्य देशांकडून किंवा सदस्य देशांच्या गटाकडून निवड करण्यात येते. आयएमएफच्या संचालक मंडळाची प्रत्येक आठवड्याला किंवा दर महिन्याला बैठक होते.

हेही वाचा-गायीच्या शेणापासून तयार केलेल्या साबणाचे नितीन गडकरींकडून लाँचिंग

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.