मुंबई - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील रोजगार निर्मिती घटली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत नव्या आर्थिक वर्षात १६ लाख रोजगार कमी होतील, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने अहवालात व्यक्त केला आहे.
आसाम, राजस्थानसारख्या राज्यात विदेशातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांचे (रिमिटटन्स) प्रमाण कमी झाल्याचे एसबीआयच्या 'इकॉरॅप' या संशोधन अहवालात म्हटले. इपीएफओच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ८९.७ लाख नवे रोजगार निर्माण झाले आहेत. तर सध्याच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२० मध्ये रोजगाराचे प्रमाण १५.८ लाखांनी कमी होणार आहे.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत ७.३५ टक्के महागाईची नोंद; आरबीआयची ओलांडली मर्यादा
इपीएफओ डाटामध्ये सरकारी नोकऱ्या, राज्य सरकारच्या नोकऱ्या आणि काही खासगी नोकऱ्यांचा समावेश नाही. त्यांची २००४ पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (एनपीएस) नोंद करण्यात येते. विशेष म्हणजे तरीही एनपीएस वर्गवारीत नोकऱ्यांचे प्रमाण हे आर्थिक वर्ष २०२० मध्ये ३९,००० हजारांनी कमी असणार असल्याचा एसबीआयने अहवालात अंदाज केला आहे.
हेही वाचा-'पीएमसी'चे पुनरुज्जीवन; शरद पवारांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट