नवी दिल्ली - केंद्र सरकार लवकरच दिलासादायक उपाय योजना जाहीर करणार आहे. तसेच गरिबांना मदत आणि उद्योगांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले. सीतारामन या जागतिक बँकेच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलत होत्या.
कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा गरजू देशांना करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यावेळी सीतारामन यांनी कोरोनाच्या संकटात सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कल्याणकारी योजनांची माहिती दिली. यामध्ये मोफत आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य विमा, थेट लाभ हस्तांतरण, मोफत अन्न आणि गॅस वितरण अशा योजनांची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-शेतमालाची वाहतूक करण्यारकरता कृषी मंत्रालयाने सुरू केले खास अॅप
लघू आणि मध्यम कंपन्यांना प्राप्तिकर, जीएसटी आणि इतर नियमांचे पालन करताना मुदत वाढवून देणे यांचा समावेश आहे. केंद्रीय मध्यवर्ती बँकेचे धोरणही लवचिक राहिल्याचे सीतारामन यांनी सांगितले. बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी नियमन करणाऱ्या संस्थांनी पावले उचलल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा-टोल वसूली २० एप्रिलपासून होणार सुरू; मोटार वाहतूक संघटनेचा विरोध
भारताची लोकसंख्या मोठी असल्याने कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता होता. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता सरकारने मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेला परिणामकारक मदत केल्याचे त्यांनी सांगितले.