नवी दिल्ली - कॉर्पोरेट करातील कपातीचा निर्णय हा धाडसी निर्णय असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. या निर्णयाने भारत विदेशी गुंतवणुकीकरता आकर्षणाचे स्थान ठरेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
कॉर्पोरेट करात कपातीचा निर्णय खूप सकारात्मक पाऊल असल्याचे मत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, भारतीय कॉर्पोरेट कर हा आशियामधील वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करू शकणार आहे. थेट विदेशी गुंतवणुकीचा विचार केल्यास भारत हा खूप स्पर्धात्मक आहे. खूप चांगली गुंतवणूक आकर्षित करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-आरबीआयच्या निर्बंधाने पीएमसी बँकेचे ग्राहक चिंताग्रस्त; खोपोली, डोंबिवलीसह नवी मुंबईतील शाखेत गर्दी
देशातील गुंतवणुकदाराबाबत ते म्हणाले, त्यांच्याकडे अधिक रक्कम आहे. त्यामुळे भांडवली निधी खर्च करण्याची अधिक क्षमता आहे. पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वी आरबीआयचे गव्हर्नर हे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेत असतात. त्याप्रमाणे आज भेट घेतल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-कोल इंडियासह सिंगरेनी माईन्समधील संपाने कोळसा उत्पादन ठप्प
गेल्या २८ वर्षात सर्वात मोठी कॉर्पोरेट करात कपात-
गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपीची नोंद चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत नोंदविण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या २८ वर्षात सरकारने सर्वात मोठी कॉर्पोरेट करात कपात केली आहे. यामुळे सरकारला १.४५ लाख कोटी रुपयांच्या करावर पाणी सोडावे लागणार आहे.
हेही वाचा-भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!