ETV Bharat / business

'कोरोनाने भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी' - Chief Economic Advisor Krishnamurthy Subramanian

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यन म्हणाले, भारत हा चीनचा आशियामधील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र, भारताची चीनबरोबरील व्यापारात मोठी तूट आहे.

कृष्णमुर्ती सुब्रमण्यन
कृष्णमुर्ती सुब्रमण्यन
author img

By

Published : Feb 13, 2020, 12:47 PM IST

कोलकाता - चीनमध्ये कोरोना विषाणू रोग पसरला आहे. अशा स्थितीत भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी मिळाली आहे, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बोलत होते.

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यन म्हणाले, भारत हा चीनचा आशियामधील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र, भारताची चीनबरोबरील व्यापारात मोठी तूट आहे. कोरोनाचा चीनबरोबरील व्यापारावर किती परिणाम होणार, हे सांगणे खूप कठीण आहे. सार्सचा अनुभव लक्षात घेता भारतावर मोठा परिणाम होणार नाही.

हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग

कोरोनामुळे निर्यात-व्यापार करण्याची भारताला चांगली संधी आहे. त्यासाठी निर्यातक्षम मॉडेल राबवावे लागणार आहे. चीनमधून भारत मोठ्या प्रमाणात सुट्टे भाग, असेंब्ल्स, कंपोनन्टस अशा गोष्टींची आयात करण्यात येते. त्यानंतर भारतामधून निर्यात करण्यात येते. मोबाईल उत्पादनात तेच मॉडेल वापरण्यात येते. जर या दृष्टीने तुम्ही पाहिले तर ही भारताला चांगली संधी आहे.

हेही वाचा-महागाईचा वाढता आलेख; जानेवारीत ७.५९ टक्क्यांची नोंद

राष्ट्रीय सकल उत्पन्नाबाबत (जीडीपी) सुब्रमण्यम म्हणाले, आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात जीडीपी ६ ते ६.५ टक्के राहणार आहे. ग्रामीण उपभोक्तता आणि भांडवली खर्च यावर केंद्रीय अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विकासदर हा स्थिर नसतो. त्या श्रेणीत असण्यासाठी आपल्याला सरासरी असावे लागते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वास्तविक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर हा ५ टक्के राहिल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.