नवी दिल्ली - देशाच्या आठ मुलभूत पायाभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा एप्रिलमध्ये ३८.१ टक्क्यांनी घसरला आहे. कोरोना महामारीमुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने ही घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
गतवर्षी ८ मुलभूत क्षेत्रांनी एप्रिलमध्ये ५.२ टक्के वृद्धीदर नोंदविला होता. चालू वर्षात मार्चमध्ये ८ मुलभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा ९ टक्क्यांनी घसरला होता. आठ मुलभूत क्षेत्रामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादन, खते, स्टील, सिमेंट आणि वीजर्निमितीचा समावेश आहे.
हेही वाचा-महामारीत नोकऱ्या गमविण्याचे प्रमाण किती? सरकार गोळा करणार आकडेवारी
- खनिज तेलाच्या उत्पादनात एप्रिलमध्ये ६.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मार्च महिन्यात खनिज तेलाच्या उत्पादनात ५.५ टक्क्यांची घसरण झाली होती.
- कोळशाचे उत्पादन हे उणे १५.५ टक्के झाले आहे. मार्चमध्ये कोळशाचे उत्पादन४.४ टक्के होते.
- उर्जा निर्मितीचे उत्पादन हे एप्रिलमध्ये २२.८ टक्क्यांनी घसरले आहे. तर मार्चमध्ये उर्जा निर्मितीचे उत्पादन हे ८.२ टक्क्यांनी घसरले होते.
आठ मुलभूत क्षेत्रांची आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केली आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून पॅरासिटामॉलच्या घटकद्रव्यांच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द
कोरोना महामारीमुळे देशभरात टाळेबंदी असल्याने एप्रिल २०२० मध्ये अनेक उद्योगांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.