ETV Bharat / business

कोरोनाने ड्रॅगनवरही परिणाम; ४४ वर्षानंतर अर्थव्यवस्थेची प्रथमच घसरण

चीनने १९९२ पासून राष्ट्रीय सकल उत्पादनाची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी चीनमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४० वर्षात प्रथमच चीनचा विकासदर घसरला आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Apr 17, 2020, 1:18 PM IST

बीजिंग - कोरोनाच्या संकटाने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर १९७६ नंतर पहिल्यांदाच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घसरला आहे. ही विकासदरातील घसरण ६.८ टक्के एवढी आहे.

चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅस्टिक्सने (एनबीएस) राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था २ हजार ९१६ अब्ज डॉलरची होती. हे प्रमाण मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६.८ टक्क्यांनी कमी होते. चीनने १९९२ पासून राष्ट्रीय सकल उत्पादनाची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी चीनमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४० वर्षात प्रथमच चीनचा विकासदर घसरला आहे.

हेही वाचा-कोरोनाचे संकट : जगभरातील १०० हून अधिक देशांनी आयएमएफकडे मागितली मदत

एनबीएसच्या आकडेवारीनुसार महामारीमुळे मार्चमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण झाला होता. जानेवारी ते मार्च २०२० दरम्यान विदेश व्यापारात ६.४ टक्के घसरण झाल्याचे चीनने म्हटले आहे. कोरोनाने झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी चीनची अर्थव्यवस्था प्रयत्न करत आहे.

हेही वाचा-बँकांना मोठा दिलासा; एलसीआरचे प्रमाण १०० टक्क्यांवरून ८० टक्के करण्याचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.