नवी दिल्ली - गरिबांच्या खात्यावर रक्कम द्यावी व त्यांना मोफत धान्य द्यावे, अशी विनंती काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला केली. अशा स्थितीत केवळ निष्ठुर सरकार कृती शून्य असेल, अशी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
पी. चिदंबरम यांनी ट्विट करत कोरोनाच्या संकटात गरिबांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की अधिकाधिक लोकांकडे पैसे नाहीत. तयार केलेल्या मोफत अन्नासाठी लोक रांगेत थांबत आहेत. सरकार त्यांना भुकेपासून का वाचवू शकत नाही? त्यांचा स्वाभिमान टिकविण्यासाठी प्रत्येक कुटुंबियांच्या खात्यावर का पैसे पाठवू शकत नाही?
हेही वाचा-टाळेबंदीतही लॅपटॉपसह इतर वस्तुंची खरेदी शक्य; फ्लिपकार्ट घेतेय ऑर्डर
अन्न महामंडळाकडे (एफसीआय) ७७ दशलक्ष टन धान्य साठा आहे. त्यामधील छोटासा हिस्सा सरकार गरजूंना वितरित करू शकत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे दोन प्रश्न आर्थिक आणि नैतिक आहेत. नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन हे दोन्ही प्रश्नांना उत्तर देण्यात अपयशी ठरले आहेत. ते मदत करत नसल्याचे देश पाहत आहे, असे चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. रोजगार नसल्याने जगणे कठीण झालेल्या गरिबांना थेट रक्कम द्यावी, अशी मागणी चिदंबरम यांनी केली.
हेही वाचा-विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय नाही; एअर इंडियाने बुकिंग सुरू केल्यानंतर सरकारचे स्पष्टीकरण
दरम्यान, हजारो स्थलांतरित कामगार हे विविध राज्यांच्या सीमेवर अडकले आहेत. त्यांना स्वत:च्या राज्यात परतायचे असताना काही ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.