नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशामधील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार केवळ कर मिळविण्याकरता जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महागाई हा शाप आहे. केंद्र सरकार केवळ जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे. देशाच्या विनाशाविरोधात तुमचा आवाज उठवा. वाढत्या किमतीविरोधातील मोहिमेत सहभागी होऊन बोला. ट्विटबरोबर राहुल गांधी यांनी निदर्शने करणाऱ्या लोकांचा व्हिडिओही जोडलेला आहे.
हेही वाचा-नेटफ्लिक्स करणार टिकटॉकशी तगडी स्पर्धा; लाँच केले फास्ट लाफ्स अॅप
गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. विरोधी पक्षांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती करण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलन करण्यात आली आहेत.
हेही वाचा-इंधनावरील करात कपात करूनही केंद्राचे महसूल उद्दिष्ट होऊ शकते पूर्ण