नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रासाठी तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील ११२ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात आयुष्यान रुग्णालये प्राधान्ये सुरू करण्यात येणार आहेत.
- महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणांना कर सवलत देण्यात येणार आहे.
- टीबी हरेगा देश जीतेगा अशी मोहीम राबवून क्षयरोगाचे २०२५ पर्यंत उच्चाटन करण्यात येणार आहे.
- श्रेणी २ शहरांमध्ये आणखी रुग्णालयांची गरज आहे.
- आयुष्यमान भारत योजनेत २०,००० रुग्णालयांचा समावेश आहे.
- इंद्रधनुष्य योजनेत आणखी नव्या रोगांचा समावेश करण्यात येणार आहे.
- स्वच्छ पाणी जल जीवन मिशन आणि स्वच्छता मिशन ही गरीबांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणखी विस्तारित करण्यात येणार आहे.