ETV Bharat / business

' बँकांकडील सकल बुडित कर्जाचे प्रमाण मार्च 2021पर्यंत 12 टक्के होणार'

author img

By

Published : Jul 24, 2020, 7:05 PM IST

अत्यंत प्रतिकूल स्थितीत बँकांकडील सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे मार्च 2021 पर्यंत 14.7 टक्के होईल, असा अंदाज आरबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

संग्रहित - भारतीय रिझर्व्ह बँक
संग्रहित - भारतीय रिझर्व्ह बँक

मुंबई – देशातील सर्व बँकांकडील सकल बुडित कर्जाचे (जीएनपीए) प्रमाण हे वाढणार असल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. मार्च 2020 पर्यंत सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे 8.5 टक्के होते. चालू आर्थिक वर्षाखेर सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे 12.5 टक्के होईल, असा अंदाज आरबीआयच्या वित्तीय स्थिरता अहवालात (एफएसआर) व्यक्त केला आहे.

अत्यंत प्रतिकूल स्थितीत बँकांकडील सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे मार्च 2021 पर्यंत 14.7 टक्के होईल, असा अंदाज आरबीआयच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

बँकांनी अधिक जोखीम घेवू नये- आरबीआय गव्हर्नर

देशाची बँकिंग व्यवस्था बळकट आहे. असे असले तरी बँकांनी कोरोना महामारीत आणि कोरोना महामारीनंतर मोठी जोखीम घेवू नये, असा सल्ला आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला. वित्तीय स्थिरता अहवालाबाबत बोलताना गव्हर्नर दास यांनी बँक आणि वित्तीय संस्थांना भांडवल वाढविणे आणि संकटातून बाहेर पडण्यावर प्राधान्य द्यावे, असे सूचविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.