सिडनी- कोरोना महामारीचा ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. गेल्या २८ वर्षात ऑस्ट्रेलियाच्या विकासदरात पहिल्यांदाच मोठी घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विकासदरात जूनमध्ये ७ टक्के घसरण झाली आहे. ही १९५९ नंतर सर्वात मोठी घसरण झाल्याचे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉर्रिसन यांनी हा दिवस ऑस्ट्रेलियासाठी भयानक असल्याचे म्हटले आहे. गेल्या २८ वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया मंदीला सामोरे जात आहे. सलग दोन तिमाहीत विकासदरात घसरण झाली आहे.
हेही वाचा-बँका कर्जाची पुनर्रचना करण्यास मुक्त; मात्र कर्जदारांना दंड आकारता येणार नाहीत
कोरोनाचा ऑस्ट्रेलियाच्या राजकोषावर परिणाम झाल्याचे राजकोष अधिकारी जॉश फ्रिडेनबर्ग यांनी सांगितले. ते म्हणाले, की गेल्या २८ वर्षे सलग सुरू असलेला आर्थिक विकासदर आता थांबला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या विकासदरात १९३० मध्ये सर्वाधिक ९.५ टक्के घसरण झाली होती. तेव्हा जागतिक महामंदीचा ऑस्ट्रेलियावर वाईट परिणाम झाला होता.
हेही वाचा-इन्फोसिस २०२२ पर्यंत १२ हजार अमेरिकन लोकांना देणार नोकऱ्या
दरम्यान, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या जीडीपीत पहिल्या तिमाहीत २३. ९ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही गेल्या ४० वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे.