ETV Bharat / business

VIDEO- केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डुलक्या

केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अतनू चक्रवर्ती यांना झोप अनावर होत नव्हती. ते डुलक्या घेत होते. तर दुसरीकडे पांडे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देत होते.

डुलक्या घेताना अतनू चक्रवर्ती
Atanu Chakraborty takes nap
author img

By

Published : Feb 8, 2020, 5:19 PM IST

Updated : Feb 8, 2020, 6:03 PM IST

चेन्नई - केंद्रीय अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विविध शहरात माध्यम प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ आणि इतरांशी संवाद साधत आहे. त्यांनी चेन्नईमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अतनू चक्रवर्ती हे चक्क डुलक्या घेताना दिसून आले.

केंद्र सरकारने 'विवाद से विश्वास' ही योजना केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. यावर माध्यम प्रतिनिधीने लाभांश वितरण योजनेत किती विवाद प्रलंबित आहेत, असा प्रश्न निर्मला सीतारामन यांना विचारला. त्यावर महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ही योजना सर्वांसाठी खुली आहे. प्राप्तिकरामधील वादांची सुमारे ४ लाख ९० हजार अपिलीय प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेची अनेकांना प्रतिक्षा होती, असेही पांडे यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव अतनू चक्रवर्ती यांना झोप अनावर होत नव्हती. ते डुलक्या घेत होते. तर दुसरीकडे पांडे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती देत होते. या पत्रकार परिषदेला वित्तीय सचिव राजीव कुमार आदी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डुलक्या

हेही वाचा-खेळणी आयातदारांचा नव्या शुल्काला विरोध; उद्योगावर परिणाम होण्याची भीती

गुजरात केडरचे आहेत अतनु चक्रवर्ती-
गतवर्षी सुभाष चंद्र गर्ग यांच्याजागी अतनु चक्रवर्ती यांची अर्थव्यवहार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चक्रवर्ती हे १९८५ चे गुजरात केडरचे सनदी अधिकारी आहेत.

हेही वाचा-मध्यप्रदेश सरकारकडून अनिल अंबानींच्या कंपनीला दिलासा; 'हा' घेतला निर्णय

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
Last Updated : Feb 8, 2020, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.