बँकॉक - बहुचर्चित अशा 'आरसीईपी'मध्ये भारताने सहभागी न होण्याचे ठरविले आहे. या करारामधील मुख्य चिंताजनक प्रश्न सुटले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारमधील सूत्राने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'आरसीईपी'त सहभागी न होण्यावर ठाम राहिल्याचे सूत्राने सांगितले. भारताच्या महत्त्वाच्या हिताबाबत तडजोड करण्यात येणार नाही, असे सूत्राने सांगितले. तसेच आरसीईपी करार हा मूळ उद्देशाप्रमाणे नाही. त्यातून योग्य आणि संतुलित असे निष्पन्न होणार नाही, असेही सूत्राने म्हटले. चीनमधून होणाऱ्या आयातीवर संरक्षण व बाजारपेठ प्रवेशासाठी खात्रीशीर अशा आश्वासनाचा अभाव, या भारताच्या दृष्टीने विविध चिंताजनक बाबी आहेत.
हेही वाचा-आरसीईपीच्या प्रस्तावित करारावर सदस्य देशांकडून संयुक्त निवेदन जाहीर होण्याची शक्यता
आरसीईपी हा जगातील सर्वात मोठा प्रस्तावित प्रादेशिक मुक्त व्यापार करार आहे. या कराराला काँग्रेससह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचनेही विरोध दर्शविला आहे.