नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी उर्जा क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

- हायड्रोजन मिशनची स्थापना करण्यात येईल
- उज्ज्वला योजनेमध्ये वाढ करण्यात येईल
- उज्ज्वला योजनेमध्ये आणखी १ कोटी लाभार्थ्यांचा समावेश करणार
- सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये १०० नव्या जिल्ह्यांचा समावेश करणार
- जम्मू-काश्मीरपर्यंत गॅस पाईपलाईन नेण्यात येणार
- उर्जा क्षेत्रासाठी एक नवीन फ्रेमवर्क तयार करण्यात येईल, ज्याद्वारे ग्राहकांना एकापेक्षा अधिक कंपन्यांची सेवा घेण्याची मुभा असेल