ETV Bharat / business

जीडीपी ५ टक्के ही सरकारची जागे होण्याची वेळ - किरण मुझुमदार शॉ - मराठी बिझनेस न्यूज

सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक पण सावधगिरीच्या पवित्र्यात आहे. मात्र,  सरकार अर्थव्यवस्थेला चालना देणे नाकारू शकणार नाही. दुसऱ्या तिमाहीदरम्यानचा जीडीपी आणखी घसरणार असल्याची शक्यता उद्योगपती किरण मुझुमदार शॉ यांनी व्यक्त केली.

किरण मुझुमदार शॉ
author img

By

Published : Aug 31, 2019, 12:56 PM IST

मुंबई - जीडीपी हा ५ टक्क्यापर्यंत घसरल्याने आर्थिक आपतकालीन स्थितीचे चित्र स्पष्ट होत असल्याचे मत उद्योगपती किरण मुझुमदार शॉ यांनी व्यक्त केले. सरकारला जागे होण्याची वेळ आली असून आणखी व वेगाने कृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्या 'इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह २०१९' च्या बंगळुरूमधील कार्यक्रमात बोलत होत्या.

किरण मुझुमदार शॉ म्हणाल्या, ५ टक्के जीडीपी कमी होईल हे कुणालाही अपेक्षित नव्हते. उत्पादन क्षेत्र हे महत्त्वाचे क्षेत्र असून त्यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जर अर्थव्यवस्था घसरत असल्याची वस्तुस्थिती असेल तर पुढे काय? असा त्यांनी यावेळी सवाल केला.

अर्थव्यवस्था केवळ घसरत नाही तर ठप्प होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, विकासदर घसरत असल्याच्या आकडेवारीमधून मागणी कमी झाल्याचे सूचित होत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जीएसटीमधील २८ टक्क्यांची वर्गवारी पूर्णपणे दूर करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्या २८ टक्के जीएसटीचा वाहन उद्योग आणि हॉस्पॅटिलिटी क्षेत्रावर वाईट परिणाम होत आहे. त्यातून नोकऱ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर कमी करून सरकार मागणी वाढविण्यासाठी मदत करू शकते. जास्त प्रमाणात खरेदी झाल्यास कर महसुलात घट होणार नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले.

सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रथम चिंताजनक गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही का गुंतवणूक करावी, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सरकारी बँकांच्या विलनीकरणाच्या निर्णयाचे शॉ यांनी स्वागत केले.

सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक पण सावधगिरीच्या पवित्र्यात आहे. मात्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देणे नाकारू शकणार नाही. दुसऱ्या तिमाहीदरम्यानचा जीडीपी आणखी घसरणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक उद्योजकांच्या भेटी घेतल्या होत्या. याबाबत बोलताना शॉ यांनी सरकार अधिक ग्रहणशील झाल्याचे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था ३ लाख कोटी डॉलरची होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मात्र ५ टक्के जीडीपी असताना ३ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था कशी करता येईल, हे माहित नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

किरण मुझुमदार शॉ या बायॉकॉन जैवऔषधी कंपनीच्या व्यस्थापकीय संचालक आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.