ETV Bharat / business

पंतप्रधान कोण होईल.. सांगा अन् कॅशबॅक मिळवा ; झोमॅटोची ऑफर - Online food delivering

वापरकर्त्यांना प्रत्येक ऑर्डरच्या वेळी ४० टक्के सवलत व ३० टक्के कॅशबॅक देण्यात येणार असल्याचे झोमॅटोने म्हटले आहे. २२ मे पर्यंत कोणीही योग्य अंदाज वर्तविला तरी त्याला कॅशबॅक दिली जाणार आहे. जेव्हा पंतप्रधान निवडले जातील, तेव्हा ते पैसे वॉलेटमध्ये जमा होतील, असे कंपनीने म्हटले आहे.

झोमॅटो
author img

By

Published : May 20, 2019, 6:13 PM IST

नवी दिल्ली - ऑनलाईन फुड घरपोहोच देणाऱ्या झोमॅटोने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करणारी ऑफर जाहीर केली आहे. जर कोण पंतप्रधान होणार आहे, याचा ग्राहकाने योग्य अंदाज वर्तविला तर झोमॅटोकडून कॅशबॅक दिली जाणार आहे.

वापरकर्त्यांना प्रत्येक ऑर्डरच्या वेळी ४० टक्के सवलत व ३० टक्के कॅशबॅक देण्यात येणार असल्याचे झोमॅटोने म्हटले आहे. २२ मे पर्यंत कोणीही योग्य अंदाज वर्तविला तरी त्याला कॅशबॅक दिली जाणार आहे. जेव्हा पंतप्रधान निवडले जातील, तेव्हा ते पैसे वॉलेटमध्ये जमा होतील, असे कंपनीने म्हटले आहे. यामध्ये देशातील २५० शहरांमधून ३ लाख २० हजार ग्राहकांनी सहभाग घेतल्याचे झोमॅटोकडून सांगण्यात आले आहे.

झोमॅटोने एलेक्शन लीग या नावाने ऑफर ग्राहकांसाठी जाहीर केली आहे. नुकताच झोमॅटोने प्रिमिअर लीग या नावाने ऑफर दिली होती. आयपीएलमध्ये कोणता संघ विजेता होणार याचा योग्य अंदाज वर्तविणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅकची ऑफर देण्यात आली होती.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.