ETV Bharat / business

येस बँकेकडून डिश टीव्ही इंडियाच्या २४.१९ टक्क्यांची खरेदी

author img

By

Published : May 30, 2020, 8:20 PM IST

डिश टीव्ही इंडियाने कर्जासाठी येस बँकेकडे शेअर तारण ठेवले होते. या कर्जवसुलीसाठी येस बँकेने डिश टीव्ही इंडियाचे शेअर घेतले आहेत.

येस बँक
येस बँक

मुंबई - येस बँकेने डिश टीव्ही इंडियामध्ये ४४.५३ टक्के कोटींचा हिस्सा विकत घेतला आहे. यामुळे डिश टीव्ही इंडियाचा २४.१९ टक्के हिस्सा येस बँकेकडे येणार आहे.

डिश टीव्ही इंडियाने कर्जासाठी येस बँकेकडे शेअर तारण ठेवले होते. या कर्जवसुलीसाठी येस बँकेने डिश टीव्ही इंडियाचे शेअर घेतले आहेत. झी ग्रुपच्या एसेल बिझनेस इक्सेलेन्स सर्व्हिसेस, एस्सेल कॉर्पोरेट रिसोर्सेस, लाईव्हिंग एन्टरटेनमेंट एन्टरप्रायझेस, लास्ट माईल ऑनलाईन, पॅन इंडिया नेटवर्क इन्फ्रावेस्ट, आरपीडब्ल्यू प्रोजेक्ट्स, मुंबई डब्ल्यूटीआर आणि पॅन इंडिया इन्फ्राप्रोजेक्ट्सचे कर्ज थकले आहे.

हेही वाचा- टाळेबंदीतही उद्योगाची चिकाटी.. ह्युदांईकडून ५ हजार चारचाकीची निर्यात

डिश टिव्ही इंडिया हे थेट घरापर्यंत मनोरंजन देणारी सेवा आहे. कंपनीकडून ६५५हून चॅनेल देण्यात येतात. तर ४० ऑडिओ चॅनेल आणि ७० एचडी चॅनेल आहेत. डिश टिव्हीला ३१ मार्च २०१९मध्ये ६ हजार २१८.२८ कोटींचा महसूल मिळाला होता. डिश टीव्ही इंडिया ही झी ग्रुपकडून चालविण्यात येते.

हेही वाचा-टाळेबंदीमधून बाहेर पडण्याकरता भारताला बुद्धिवान रणनीतीची गरज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.